Maharashtra Police Constable Syllabus | अभ्यासक्रम संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शासनाकडून पोलीस भरती 2024-25 ची अधिकृत घोषणा लवकरच होणार असून अनेक उमेदवार या संधीची आतुरतेने वाट पाहत होते. जर तुम्ही देखील Maharashtra Police Bharti 2024 – 25 साठी तयारी करत असाल, तर तुम्हाला यामध्ये Maharashtra Police Constable Syllabus 2024 म्हणजेच महाराष्ट्र पोलीस भरती 2024 – 25 चा संपूर्ण अभ्यासक्रम दिलला आहे .
लेखातील महत्वाचे मुद्दे:
- महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे टप्पे
- लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम (syllabus)
- शारीरिक चाचणी
- अभ्याच्या टिप्स
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 – परीक्षा टप्पे:
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती परीक्षा साठी खालील तीन ते चार प्रमुख टप्प्यांमध्ये घेतली जाते:
- शारीरिक चाचणी (Physical Test) – 50 गुण
- लेखी परीक्षा (Written Exam) – 100 गुण
- डॉक्युमेंट्स चेकिंग
- मेडिकल चाचणी
Maharashtra Police Constable Syllabus – लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम:
लेखी परीक्षा 100 गुणांची असून 90 मिनिटांचा वेळ दिला जातो. खालील विषयांचा समावेश असतो:
विषयाचे नाव | प्रश्नसंख्या | गुण |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 25 | 25 |
बौद्धिक चाचणी / बुद्धिमत्ता चाचणी | 25 | 25 |
गणित | 25 | 25 |
मराठी व्याकरण | 25 | 25 |
एकूण | 100 | 100 |
1. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी:
- भारताचे संविधान
- स्वातंत्र्य चळवळ
- आधुनिक भारताचा इतिहास
- राज्य व केंद्र सरकार योजना
- महाराष्ट्राचा भूगोल व इतिहास
- चालू घडामोडी (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय)
2. बुद्धिमत्ता चाचणी:
- अंकगणितीय तर्क
- आकृती व आकड्यांची मालिका
- वेगवेगळे नमुने ओळखणे
- तर्कशक्ती व निर्णय क्षमता
3. गणित:
- सरासरी
- टक्केवारी
- नफा-तोटा
- अनुपात व प्रमाण
- वेळ व काम
- सोपे गणिती प्रश्न
4. मराठी व्याकरण:
- वाक्यरचना
- विरामचिन्हे
- समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
- वाक्यप्रकार
- वाक्यशुद्धी
महाराष्ट्र पोलीस शारीरिक चाचणी – Physical Test Details:
पुरुष उमेदवारांसाठी:
- धावणे (1600 मीटर) – 20 गुण
- गोळाफेक (7.26 kg) – 15 गुण
- 100 मीटर शर्यत – 15 गुण
महिला उमेदवारांसाठी:
- धावणे (800 मीटर) – 20 गुण
- गोळाफेक (4 kg) – 15 गुण
- 100 मीटर शर्यत – 15 गुण
अभ्यास टिप्स:
- दररोज चालू घडामोडी वाचा.
- मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा.
- बुद्धिमत्ता चाचणीसाठी नियमित सराव करा.
- शारीरिक चाचणीसाठी रोज व्यायाम करा.
महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम |
|||
१ | महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल | ७ | विज्ञान : मानवशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशात्र, भौतिकशात्र |
२ | महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, प्राचीन इतिहास, समाजसुधारक | ८ | पोलीस प्रशासन |
३ | राज्यघटना व पंचायतराज | ९ | गणित |
४ | अर्थशास्त्र | १० | भूमिती |
५ | चालू घडामोडी | ११ | बुद्धिमत्ता |
६ | कॉम्पुटर | १२ | मराठी व्याकरण |
निष्कर्ष:
जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती 2024 – 25 साठी तयारी करत असाल, तर वर दिलेला Maharashtra Police Constable Syllabus लक्षात घेऊन नियोजन करून अभ्यास करा. वेळेवर तयारी सुरु केल्यास नक्कीच यश मिळेल!

Nikhil Chitte
नमस्कार, मी निखिल चित्ते mahamh.in चा मुख्य संपादक तसेच लेखक म्हणून कार्यरत आहे. मी BCA मधून माझी पदवी पूर्ण केली असून वेबसाइट वर्क मध्ये मागील २ वर्षांपासून रुजू आहे. मला लेखन तसेच टेक्निकल क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लेखन, Scripting आणि वेब मॅनेज मी करतो . अधिक माहितीसाठी खाली क्लिक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.
Follow me on Instagram